Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रडॉक्टर दिनी हृदयद्रावक बातमी : किरकोळ वादानंतर डॉक्टर दाम्पत्याची आत्महत्या

डॉक्टर दिनी हृदयद्रावक बातमी : किरकोळ वादानंतर डॉक्टर दाम्पत्याची आत्महत्या

पुणे : (pune)

राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त संपूर्ण देश डॉक्टरांना (doctor) शुभेच्छा देत असताना पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पती-पत्नीमध्ये झालेल्या किरकोळ वादानंतर दाम्पत्याने (doctor couple)गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. २६ वर्षीय डॉक्टर पत्नीच्या आत्महत्येनंतर २८ वर्षीय डॉक्टर पतीनेही आयुष्य संपवलं. दोघांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. मात्र जागतिक डॉक्टर दिनीच ही घटना उघडकीस आल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

भारतातील नवीन लस Zydus Cadila , इंजेक्शनची गरज नसणार, मुलांसाठी चालणार का?

पुण्यातील वानवडी परिसरातील आझाद नगर येथे डॉक्टर निखिल शेंडकर (Nikhil Shendkar) आणि अंकिता निखिल शेंडकर (Ankita Nikhil Shendkar)राहात होते. निखिल आणि अंकिता शेंडकर यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर ते प्रॅक्टिस करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद झाला होता. बुधवारी रात्री दोघांमध्ये फोनवरुन बोलणं झालं. यादरम्यान त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर अंकिताने रागारागात फोन ठेवून दिला. पण, निखिल जेव्हा घरी आला त्याला घडलेला प्रकार पाहून धक्काच बसला. अंकिताने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला होता. ३० जून रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास वानवडी पोलिस चौकीचे अंमलदार इनामदार यांना डॉ. अंकिता शेंडकर यांनी वानवडी येथील राहत्या घरी पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याची माहिती मिळाली. या घटनेला काहीसा कालावधी लोटत नाही, तोपर्यंतच त्यांचे पती डॉ. निखिल शेंडकर यांनी आज (गुरुवार 1 जुलै) सकाळी सात वाजताच्या सुमारास ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन केली आत्महत्या केली.

किरकोळ वादावरुन या नवविवाहित दाम्पत्याने डॉक्टर्स दिनादिवशीच आपलं आयुष्य संपवलं. असे असले तरी पती-पत्नीमध्ये फोनवरुन काय चर्चा झाली होती? कोणत्या कारणामुळे अंकिताने आत्महत्येसारखं टोकालं पाऊल उचललं हे समजू शकलेलं नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या