मृतदेहाचे ३५ तुकडे करणाऱ्या प्रियकराचा पोलिसांकडे धक्कादायक खुलासा

मृतदेहाचे ३५ तुकडे करणाऱ्या प्रियकराचा  पोलिसांकडे धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली | New Delhi

वसईतील (Vasai) एका २६ वर्षीय तरुणीची तिच्याच प्रियकराने दिल्लीत खून (Murder)करुन मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब असे या आरोपीचे नाव असून त्याने प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत प्रेयसी आणि आफताब यांची भेट मुंबईतील (Mumbai)एका कॉल सेंटरमध्ये झाली होती. दोघांमध्ये आधी मैत्री झाली त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते. दोघेही प्रेमात आकंठ बुडाले होते. त्यांनी कुटुंबीयांना माहिती दिली. पण, घरच्यांचा विरोध होत असल्यामुळे दोघेही दिल्लीला पळून गेले. दिल्लीमध्ये छतरपुर दोघे एकत्र राहत होते.

त्यानंतर मृत प्रेयसीने तिचा प्रियकर आफताब याच्याकडे लग्नाचा तगादा लावल्याने त्याने तिचा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. यानंतर पोलिसांनी आरोपी पूनावाला याला अटक केली आहे. गेल्या सहा महिन्यापासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते, अखेर पोलिसांनी या विकृत प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.

तसेच चौकशीदरम्यान आफताबने पोलिसांसमोर काही धक्कादायक खुलासे देखील केले आहेत. मृतदेहाची विल्हेवाट लावणं कठीण असल्याने आपण त्याचे तुकडे करण्याचे ठरवले. यासाठी आपण इंटरनेटची मदत घेतली. आपला आवडता टीव्ही शो ‘डेक्स्टर’मुळे आपल्याला मदत झाली असे त्याने सांगितले.

मृतदेहाचे ३५ तुकडे करणाऱ्या प्रियकराचा  पोलिसांकडे धक्कादायक खुलासा
ट्रक-मोटारसायकलचा अपघात; दुचाकीधारक गंभीर जखमी

आफतबाने सर्वात आधी ३०० लीटरचा एक फ्रीज खरेदी केला. त्याने काही वर्षांपूर्वी शेफ होण्यासाठी प्रशिक्षण घेतले होते. त्या कौशल्याचा फायदा त्याने मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी घेतला. कोणलाही शंका येऊ नये यासाठी त्याने मृतदेहाचे फार छोटे छोटे तुकडे केले.

मृतदेहाचे ३५ तुकडे करणाऱ्या प्रियकराचा  पोलिसांकडे धक्कादायक खुलासा
राजधानी हादरली! वसईच्या तरुणीची दिल्लीमध्ये निर्घृण हत्या, शरीराचे केले ३५ तुकडे

दरम्यान,आरोपी प्रियकराने मृतदेहाचे तुकडे तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर ते जंगल भागात विविध ठिकाणी फेकून दिले. सहा महिन्यानंतर हे क्रौर्य उघडकीस आले. तसेच पोलीस चौकशीत आरोपीने तिचा गळा दाबणं सोपं होतं, पण मृतदेहाची विल्हेवाट लावणं फार कठीण होतं असे म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com