
नंदुरबार l Nandurbar प्रतिनिधी
पेट्रोल पंप वर (Petrol pump) वाहनांच्या रांगा लागल्या असताना काल एका वाहनचालकाने दुधाच्या कॅनमध्ये (Milk cans) डिझेल भरल्याचे चित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान याबाबत पुरवठा विभागाच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
पेट्रोल पंप चालकांच्या विविध मागण्यांसाठी दिनांक 31 मे रोजी देशव्यापी बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक 30 मे रोजी रात्री पेट्रोलपंपांवर वाहनांची गर्दी झाली होती. ज्वलनशील पदार्थांची विक्री करणे तसेच ज्वलनशील पदार्थ सोबत बाळगणे देखील गुन्हा असताना या नियमांची मोठ्या प्रमाणावर पायमल्ली होताना दिसून येत आहे.
याकडे पुरवठा विभागाने कमालीचे दुर्लक्ष केले आहे. 30 मे रोजी दिवसांपूर्वी शहरातील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल घेण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यादरम्यान वाहनचालकाने दुधाच्या कॅनमध्ये डिझेल (Diesel) भरल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे पेट्रोल पंप ((Petrol pump)) चालकांकडून नियमांची पायमल्ली होत असताना याकडे पुरवठा विभाग दुर्लक्ष का करत आहे असा सवाल उपस्थित होत आहे.