पतीच्या अपघाती निधनाचा धक्का पत्नीने केली आत्महत्या

बहाळ येथील दुर्दैवी घटना
पतीच्या अपघाती निधनाचा धक्का पत्नीने केली आत्महत्या

गुढे Gudhe ता.भडगाव (वार्ताहर )

बहाळ ता चाळीसगाव येथील वाहन व्यावसायिक (Vehicle professional) संदीप रामभाऊ पाटील (वय ३४) यांचे सात दिवसापूर्वी अपघाती निधन (Accidental death) झाले. पतीच्या निधनाचा विरह व दु:ख, वियोग पत्नीला (wife) सहन न झाल्याने तीने पतीच्या पाठोपाठ सातव्या दिवशीच आज दि.१६ रोजी सकाळी ५:३० वाजता विषारी किटकनाशक औषध घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची दुदैवी व मन सुन्न होणारी घटना घडली.     

बहाळ ता.चाळीसगाव येथील रहिवासी असलेले संदीप रामभाऊ पाटील यांचे दि.१० रोजी सुरत येथे लिंबू घेऊन जात असतांना रात्री १०:४५च्या सुमारास खडकी फाटया जवळ त्यांच्या मालकीच्या माल वाहतूक गाडीला भीषण अपघात होऊन झाला. त्यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

हा अपघात इतका जबरदस्त होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. यात संदीप पाटील व समोरील गाडीच्या ड्रायव्हरचा देखील जागेवरच मृत्यू झाला.  तर दोन्ही गाडीतील चार जण जखमी झाले. संदीप पाटील हे गेल्या १५ वर्षापासून मालवाहतूक व्यवसाय करत होते. संदीप पाटील हे गाव परिसरात गोलू या टोपणनावाने ओळखले जात होते. गांव परिसरात अनेकांशी सलोख्याचे व जिव्हाळयाचे संबंध होते. तसेच शेतकरी मित्र म्हणून गाव परिसरात ओळखले जात होते त्यांच्या मृत्यूने बहाळ गावावर मोठी शोककळा पसरली आहे.

पतीचा विरह झाला असह्य

अमळनेर तालुक्यातील झाडी शिरसाळे येथील माहेरवाशीन असलेल्या दीपालीने पतीच्या अपघातात मृत्यू झाल्या दिवसापासून अन्न पाणी त्याग करून त्यांच्या वियोगात वेडीपिसी झाली होती. ती भानावर व शुध्दीवर देखील नव्हती. तिला सांभाळणे कुटुंबासाठी मोठे आवाहन होते. कुटुंब मोठ्या वियोगात असल्याने अनेकांनी संदीपच्या घरी जाणे येणे थांबवले. पण त्यांच्या पत्नी मात्र हे दुःख विसरणे कठीण होते. अशा परिस्थितीत तिला परिवार सांभाळत होता. नियतीला मात्र काही वेगळेच मान्य होते. तिने कुटुंबापासून वेगळे कारण सांगून स्वतःला बाजूला सारून दि.१६ रोजी सकाळी पहाटे ५:३० वाजेच्या सुमारास दीपालीने (वय ३० ) हीने विषारी कीटकनाशक औषध घेऊन आत्महत्या केली.

मुलांचाही नाही केला विचार

दीपालीने आपल्या मागे कोणाचाही विचार केला नाही . आपल्या मागे दोन कोवळ्या लहानग्या बाळांचा सांभाळ पुढे कोण करेल त्यांचे पुढे कसे होईल? हा विचार देखील या मातेला आला नसावा का? म्हणतात ना जाणाऱ्याला मृत्यू जवळचा वाटतो म्हणून दीपालीने हे टोकाचेे पाऊल उचलून पतीच्या विरहाने,दु;खाने तिने विषारी किटकनाशक घेऊन आपली जीवनयात्रा संपून घेतली. ही दुदैवी घटना समाज मनाला चटका लावणारी घडली आले नियतीच्या मनात येते तेव्हा तेथे कोणाचे चालत नाही मृत्यू हा नियती ठरवत असते असे बोलले जाते.

या लहानग्या बाळाचे अपघातात सात दिवसापूर्वीच पितृछत्र हरपले होते हे दु:ख विसरत नाही तोच आईने देखील या चिमुरडयांना अशा पद्धतीने सोडून जावे का? अशी हृदयद्रावक दुदैवी घटना बहाळ गावात व परिसरात  घडली आणि मोठी हळहळ व दुःख व्यक्त केले जात आहे.

दि.१६ रोजी शवविच्छेदन करून या दोन्ही चिमुकल्यांनी वडिलांच्या अपघाती निधनानंतर मोठ्या शोकाकुल वातावरणात आईला अग्नीडाग दिला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com