नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का; 'यांनी' केला शिंदे गटात प्रवेश

नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का; 'यांनी' केला शिंदे गटात प्रवेश

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सिडकोतील (CIDCO) राष्ट्रवादी युवक काँग्रेस (Nationalist Youth Congress) चे विभाग उपाध्यक्ष (Department Vice President) तथा शुभोदय फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सागर चौधरी (Sagar Chaudhary, Founder President of Shubhodaya Foundation) यांच्यासह कार्यकर्त्यांनी

खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse), महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, ग्रामीण जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक लक्ष्मीताई ताठे, मंगलाताई भास्कर यांच्या उपस्थितीत शिवसेना (shiv sena) (शिंदे गट), बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. शुभोदय फाउंडेशन तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आहे.

प्रभागातील विविध कामे करण्यास चांगले व्यासपीठ मिळावे यासाठी सागर चौधरी यांनी शनिवारी खासदार हेमंत गोडसे यांच्या संपर्क कार्यालयात प्रवेश सोहळा पार पाडत बाळासाहेबांच्या शिवसेनेत (shiv sena) प्रवेश केल्याचे सांगितले. याप्रसंगी अजिंक्य घावटे, अरविंद पारखे, अजय साळुंखे, ऋषिकेश कांगणे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com