Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

पुणे | Pune

.छत्रपती शिवाजी महाराज (chatrapati sambhaji maharaj) यांचा चरित्र महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवणारे महाराष्ट्र भूषण आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (shivshahir babasaheb purandare) यांचं निधन झालं आहे. ते १०० वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज पहाटे पाच वाजून सात मिनिटांनी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली.

- Advertisement -

शिवछत्रपती ग्रंथांची निर्मिती

बाबासाहेब हे त्यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित राजा शिवछत्रपती ग्रंथांची निर्मिती केली होती. त्याला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. त्यावर आधारीत ‘जाणता राजा’ या महानाट्याचे प्रयोग अनेक ठिकाणी झाले. जाणता राजा या महानाट्याचे गेल्या २७ वर्षांत १२५० हून अधिक प्रयोग झाले आहेत. पहिला प्रयोग १४ एप्रिल १९८४रोजी झाला होता. या प्रयोगांच्या उत्पन्नातून बाबासाहेबांनी अनेक संस्थांना लाखो रुपयांची मदत केली आहे. हे नाटक हिंदी-इंग्रजीसह ५ अन्य भाषांत भाषांतरित केले गेले आहे.’जाणता राजा’ मध्ये १५० कलावंत काम करतात आणि शिवाय हत्ती घोडेही असतात. प्रयोग करण्यासाठी मोठे मैदान लागते आणि तिथे फिरता रंगमंच उभारण्यासाठी १०दिवस आणि उतरवण्यासाठी ५ दिवस लागतात

ऐतिहासिक विषयांवर लेखन

बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन व जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले. पुरंदऱ्यांची दौलत, पुरंदऱ्यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड, व राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचे आजवर प्रकाशित झालेले साहित्य. शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून व परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला. या ग्रंथाच्या १६ आवृत्ती आजपर्यंत सुमारे ५ लाख घरांमध्ये पोहोचल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या