शिवशाही बस सुरू; आंदोलक मात्र ठाम

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक । प्रतिनिधी Nashik

एसटी कर्मचार्‍यांच्या संंंपातून MSRTC Employees Strike मार्ग निघत नसला तरी काल राज्यभरातून 36 बसेस रस्त्यावर धावल्या. त्यात 12 शिवशाही Shivshahi Buses व इतर साध्या बसेस होत्या. त्यातून 826 प्रवाशांची वाहतूक झाली. नाशिकला नाशिक – धुळे अशा दोन बस धावल्या. सिन्नरला दगडफेकीच्या घटना घडल्या, शहरात आज शातता होती. मात्र कर्मच़ार्‍यांचे आंदोलन सुरुच होते.

एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम असल्याचे व यास भारतीय जनता पक्षाची फुस असल्याच्या वृत्तावर पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, माझ्याकडे काही क्लिप आहेत ज्यात भाजपाचे सुधीर मुनगंंटीवार जेव्हा मंत्री होेते तेव्हा ते म्हणत की विलनीकरण नाही होणार. त्यांचे सरकार होते तेव्हा का नाही केले? असा प्रश्न त्यांंनी उपस्थित केला.

आता तुम्ही राजकारण करत आहेत असे ते म्हणाले. बर्‍याच गोष्टी आम्ही मान्य केल्या आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज शरद पवार यांच्या भेटीला गेले, लोकशाहीमध्ये राज्यकर्त्यांच्या प्रमुखांकडे जाऊन चर्चा करणे योग्यच आहे.यातून काही मार्ग निघेल असे भुजबळ म्हणाले.

दरम्यान, खासगी शिवशाही सुरू करून आंदोलन चिरडण्याचा सरकारचा प्रयत्न असून, एसटीचा कोणताही कर्मचारी कामावर रुजू झालेला नाही. आमचा संप सुरूच आहे. संप मोडून काढण्यासाठी खासगी शिवशाही बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहोत. न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही, अशी माहिती आंदोलकांनी दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *