Friday, April 26, 2024
HomeनाशिकNashik : शिवशाही बस चालकाची बसमध्येच आत्महत्या

Nashik : शिवशाही बस चालकाची बसमध्येच आत्महत्या

वावी | वार्ताहर | wavi

सिन्नर -शिर्डी महामार्गावर (Sinnar-Shirdi highway) नाशिक आगारच्या शिवशाही बस चालकाने बसमध्येच आत्महत्या (suicide) केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे…

- Advertisement -

HSC Results 2023 : प्रतीक्षा संपली! आज बारावीचा निकाल

याबाबत अधिक माहिती अशी की, राजू हिरामण ठुबे रा.दोनवाडे पो.विंचुरदळवी असे आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव आहे. सिन्नर -शिर्डी महामार्गावर नाशिक आगारची शिवशाही बस क्रमांक (एमएच ०९ ई.एम.१२८०) ही बस शिर्डीकडून सिन्नरकडे (Shirdi to Sinnar) जात असताना वावी पांगरी येथील शिंदे वस्तीजवळ बसमध्ये बिघाड झाल्याने दुपारी एक वाजेपासून उभी होती.

भुसावळ-पुणे रद्द; प्रवाशांचे हाल

दरम्यान, यावेळी रात्रीच्या सुमारास बसला दुरुस्त करण्यासाठी आलेल्या सिन्नर आगाराच्या पथकास सदर बसमध्ये चालकाने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी नॅशनल हायवे पेट्रोलिंग पथकाचे इनचार्ज श्रेयस हुबळीकर, सुपरवायझर प्रशांत शिंदे, रुग्णवाहिका चालक दुर्गेश शिंदे यांच्या पथकाच्या मदतीने पोलिसांना (police) पाचारण केले. तसेच आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या