Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याशिवसेनेला धक्का तर शिंदे सरकारला दिलासा!

शिवसेनेला धक्का तर शिंदे सरकारला दिलासा!

मुंबई | Mumbai

गेल्या १० दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या सत्तानाट्याला काल अखेर पुर्णविराम मिळाला. शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे नवे मुखमंत्री अशी घोषणा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. कालच ३० जून रोजीच एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला.

- Advertisement -

दरम्यान शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपाने (BJP) ही खेळी केल्याची चर्चा सुरू असतानाच आता शिवसेनेनं भाजपाला धक्का देण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या शिंदे सरकारविरोधात शिवसेनेनं थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी याचिका दाखल केली आहे.

मात्र, यासंदर्भात तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने (Supreme Court) नकार दिला आहे. ही सुनावणी ११ जुलै रोजीच होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. या निर्णयाने शिवसेनेला मोठा धक्का बसला असल्याचे मानले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या