Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याओ खासदार सांगा ना शिवसेनेचं काय चुकलं; खासदार धैर्यशील मानेंच्या विरोधात कोल्हापूरमध्ये...

ओ खासदार सांगा ना शिवसेनेचं काय चुकलं; खासदार धैर्यशील मानेंच्या विरोधात कोल्हापूरमध्ये मोर्चा

कोल्हापूर | वृत्तसंस्था Kolhapur

शिवसेनेतून शिंदे गट (Shinde Group Shivsena) वेगळा झाल्यामुळे मोठे बंड झाले आहे. आता तर खासदारांमध्ये बंडखोरी झाल्यामुळे मोठी वाताहात सेनेची झाली आहे. असे अतानाही युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray yuvasena) शिवससंवाद यात्रेत कार्यकर्त्यांशी वार्तालाप करत आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्याकडे येणाऱ्या कार्यकर्त्यांचा ओघ वाढतो आहे. अशातच आता कोल्हापूरचे खासदार धैर्यशील माने (MP Dhairyashil mane) यांच्या घरावर कोल्हापुरातील निष्ठावंत शिवसेना कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला आहे….

- Advertisement -

याप्रसंगी धैर्यशील मानेंच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला होता. खासदार सांगा ना शिवसेनेचे काय चुकले. असे प्रश्न विचारात संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

‘गली गली मै शोर है, माने चोर है’ अशा घोषणा देण्यात आल्या. मार्केट यार्ड परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली. खासदार धैर्यशील माने यांना शिवसेनेने पाठबळ देऊन निवडून आणले होते मात्र त्यांनी शिवसेना सोडल्याने त्यांच्या मतदारसंघातील शिवसैनिकआक्रमक झाले आहेत.

धैर्यशील माने यांनी हिम्मत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी आणि निवडूण यावे असे आव्हानच येथील शिवसैनिकांनी माने यांना दिले आहे. दुसरीकडे, खासदार माने यांच्या घराच्या परिसरात जमावबंदी करण्याचे आदेश पोलिसांनी दिले होते. त्यामुळे मोर्चाच्या पार्श्वभूमीवर या परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या