Video : पिंपरी चिंचवड तर नुसता ट्रेलर; आणखी १०० घोटाळयांचे आमच्याकडे पुरावे

खासदार संजय राऊत यांचा नाशकात गौप्यस्फोट
Video : पिंपरी चिंचवड तर नुसता ट्रेलर; आणखी १०० घोटाळयांचे आमच्याकडे पुरावे

नाशिक | प्रतिनिधी Nashik

पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchvad) महापालिकेतील (Municipal corporation) स्मार्ट सिटीच्या (Smart City) कामात ७५० कोटींच्या घोटाळ्याचे पुरावे आम्ही भाजपच्या किरीट सोमय्या (BJP leader kirit somaiya) यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. आता पाहूयात ते इडी (ED), सीआयडीकडे (CID) पोहोचवतात का? असे सांगत पिंपरी चिंचवड तर फक्त ट्रेलर आहे अजून १०० घोटाळ्यांचे प्रकरणे आमच्याकडे आहेत. नाशिक महापालिकेतील शेकडो कोटींचा घोटाळा आम्ही उघडकीस आणू शकतो. असे सांगत शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Shivsena leader sanjay raut) यांनी भाजपवर चांगलेच तोंडसुख घेतले....

संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने आज त्यांनी नाशिकमधील हजारो कार्यकर्त्यांशी त्यांनी दिलखुलास संवाद दादासाहेब गायकवाड सभागृहात (Dadasaheb Gaikwad Sabhagruh Nashik) साधला. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून शिवसेनेची सत्ता अबाधित आहे. यापुढेही कायम राहील. सरकार पाडणाऱ्यांचे मनसुभे कधीही पूर्ण होणार नाही. आणि आम्ही ते होऊ देणार नाही. नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आहे आणि यापुढेही कायम राहण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आगामी महापालिका निवडणुकीसह (Upcoming nmc elections) जिल्हा परिषदेवरही (Zilla parishad elections) भगवा फडकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. एवढेच नाही तर देशाची सत्ता सेनेच्या हाती येण्यासाठी आगामी काळात आमदार खासदारही उत्तर महाराष्ट्रात वाढण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे.

यावेळी त्यांनी लढाख, काश्मीर, अरुणाचल प्रदेशात चीनच्या घुसखोरीवर समाचार घेत राऊत म्हणाले की, एकीकडे देशात घुसखोरी होत असताना आपण मात्र १०० कोटी लसीकरणाचा आनंदोत्सव साजरा करत आहोत. १०० कोटी लसी खरोखर झाल्या की नाही कुणी पहिल्या असे म्हणत गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही खा राऊत यांनी टीका केली.

पश्चिम बंगालमध्ये ममता बनर्जी (mamta banerji) यांनी ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime minister narendra modi) व गृहमंत्री अमित शाह (BJP union minister Amit Shah) यांचे आव्हान परतवून लावण्यासाठी जो लढा दिला. व यश संपादन केले त्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले. महाराष्ट्रातही स्वाभिमान कायम ठेवण्यासाठी असाच लढा द्यावा असे आवाहन करत सेनेचा पाठीशी खंबीरपणे उभे राहून भाजपचे आव्हान परतावून लावण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.

अन सभागृह अचंबित

यावेळी भाजपचे नगरसेवक विशाल संगमनेरे (BJP Corporator vishal sangamnere) यांनी अचानक सभागृहातील व्यासपीठावर प्रवेश करत खासदार संजय राऊत यांचा जाहीर सत्कार केला. संवाद कार्यक्रमात अचानक भाजप नगरसेवक अवतरल्याने सभागृह काही काळ अचंबित झाले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com