... म्हणूनच मी शिंदे गटासोबत गेलो; हेमंत गोडसेंची नाशकात प्रतिक्रिया

नाशिक । Nashik

शिवसेना नेते (Shiv Sena leader) एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या (Shivsena) ४० आमदारांनी (MLA) बंड केले होते. त्यानंतर सेनेचे १२ खासदार (MP) शिंदे गटात (Shinde Group) सामील झाले होते. यामध्ये नाशिकचे (Nashik) खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांचाही समावेश होता. शिंदे गटात सामील झाल्यानंतर खा. गोडसे आज नाशिकमध्ये परतले. यांनतर त्यांच्या समर्थकांनी इगतपुरी (Igatpuri) येथील घाटनदेवी (Ghatan Devi) परिसरात त्यांचे स्वागत केले. त्यानंतर गोडसेंनी माध्यमांशी संवाद साधत आपण शिंदे यांच्यासोबत का गेलो यावर भाष्य केले...

यावेळी बोलतांना गोडसे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी हिंदुत्वासाठी जे पाऊल उचलले आहे ते हिंदूहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांचे संघटन आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांचे प्रतीक पुढे नेण्यासाठी आम्ही आमदार - खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो असे त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, गेल्या आठ वर्षांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघात (Nashik Lok Sabha Constituency) अनेक विकासकामे केली. तसेच नाशिक - पुणे रेल्वे (Nashik - Pune Railway) मेट्रो (Metro) मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (Mumbai Industrial Corridor) नदीजोड प्रकल्प (River Linking Project) रिंगरोड (Ring Road) यासारखी विकासकामे मंजूर होण्याच्या उंबरठ्यावर असून ती पूर्ण करण्यासाठी राहिलेल्या दोन वर्षात प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, मागील अडीच वर्षापूर्वी भाजपची (BJP) साथ सोडून जी महाविकासआघाडी (Mahavikas aaghadi) बनवली गेली ती कुठल्याही आमदार खासदाराला रुचली नाही. त्यामुळे या सर्वांच्या मनात खदखद होती असेही त्यांनी सांगितले. तसेच आज जो शिवसेनेचा परिवार आहे तो पूर्वीप्रमाणे पुन्हा एकत्र यावा यासाठी आई घाटनदेवी चरणी प्रार्थना करतो असेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com