सध्याचे राजकारण घृणास्पद; उद्धव ठाकरेंची भाजप अध्यक्षांवर टीका

भाजप अध्यक्ष जे पी नडडांच्या 'त्या' वक्तव्यावर टीका
उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

देशातील राजकीय पक्ष संपवण्याचे कटकारस्थान सध्या भाजपकडून केले जात अएह. आपला देश कुठे चाललेला आहे किंवा कुठे नेऊन ठेवला आहे. आताचे राजकारण निर्घुण आणि घृणास्पद असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ते आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधत होते....

थोड्याच वेळेपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, संजय राऊत यांचा नक्कीच अभिमान आहे.

संजय राऊत यांच्या अटकेनंतर शिवसेनेकडून विरोधी पक्षांना लक्ष केले जात आहे. इडीची कारवाई आकसापोटी झाली आहे. घृणास्पद राजकारण करू नका दिवस फिरले की काय होईल याचा विचार करा असाही टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला.

भाजपसोबत लढणारी किंवा लढणारा कुठलाही विचार कुठल्याही पक्षाकडे नाही. अनेक पक्ष संपण्याच्या मार्गावर आहेत असे वक्तव्य नडडांनी केले आहे. राजकारण म्हणजे बुद्धिबळाचा खेळ आहे. मात्र, सध्याचे राजकारण बुद्धीचे नव्हे तर बळाचा वापर करून केला जात आहे.

आजचे नडडांचे वक्तव्य एकून असे दिसते आहे की, भाजपला शिवसेना संपवायची आहे. नडडांची वक्तव्य याचीच पुष्टी करतात असेही ठाकरे म्हणाले.

मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही असे संजय राऊत म्हणाले आहेत. संजय शरण जाणाऱ्यातला नाही. आम्ही चांगले मित्र आहोत. संजयचा नेमका गुन्हा काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

बंडखोर जे गेले त्यांचीही सत्ता गेली की काय अवस्था होईल ते कळेलच. गेल्या काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी जसे म्हटले होते की राजकारण सोडून द्यावेसे वाटते. अगदी तसाच विचार येतो आहे. राजकारण सोडण्याचा विचार नव्हे, पण सध्याचे राजकारण घृणास्पद झाले असल्याने देश कुठे चालला आहे हे सर्वसामान्य जनतेने पाहणे महत्वाचे आहे असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com