शिवसेनेला पुन्हा धक्का! आता खासदारही बंडाच्या पवित्र्यात

शिवसेनेला पुन्हा धक्का! आता खासदारही बंडाच्या पवित्र्यात

नवी दिल्ली । New Delhi

राज्यात काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या (shivsena) आमदारांनी बंड केले होते. त्यानंतर आता हे बंड शिवसेनेच्या खासदारपर्यंत (shivsena mp) पोहचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातच कालपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) दिल्लीत असल्याने शिवसेनेच्या काही खासदारांची काल दिल्लीत शिवसेना खासदार कृपाल तुमाणे यांच्या घरी बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे...

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खासदार कृपाल तुमाणे (MP Krupal Tumane) यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) भावना गवळी (MP bhavana gawali) यांच्यासह आणखी ८ खासदार उपस्थित असल्याचे बोलले जात आहे. या बैठकीस भाजपचा एक ज्येष्ठ नेताही उपस्थित असल्याचे समजते. तसेच काही दिवसापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बोलावलेल्या बैठकीला तीन खासदारांनी दांडी मारली होती.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून एकनाथ शिंदे यांची भूमिका योग्य असल्याचे म्हटले होते. त्यानंतर शिवसेनेने त्यांच्याकडे असणारे लोकसभेतील प्रतोद पद काढून घेतले होते. यानंतर खासदार राजन विचारे (MP Rajan Vichare) यांची लोकसभेतील शिवसेनेचे मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच शिवसेनेचे मुंबईतील खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी पत्र लिहून राष्ट्रपती निवडणुकीत (Presidential Election) द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती. त्यावर खासदारांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com