या फंद्यात पडू नका नाहीतर...; संजय राऊतांचा फडणवीसांना गर्भित इशारा

या फंद्यात पडू नका नाहीतर...; संजय राऊतांचा फडणवीसांना गर्भित इशारा

मुंबई | Mumbai

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी (mahavikas aaghadi) सरकार पडेल अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातच शिवसेनेच्या (shivsena) जवळपास ४० आमदारांसह (mla) एकनाथ शिंदे हे गुवाहाटी (Guwahati) येथील एका हॉटेलमध्ये थांबले असून ते भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापन करणार असल्याचे बोलले जात आहे.

या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) गुप्त बैठकांमधून आगामी परिस्थितीत काय पावले उचलावीत, याविषयी सल्लामसलत करत असल्याने शिवसेना खासदार (ShivSena MP) संजय राऊतांनी (Sanjay Raut) त्यांना गर्भित इशारा दिला आहे...

यावेळी बोलतांना संजय राऊत म्हणाले ,'मी देवेंद्र फडणवीस यांना सांगू इच्छितो की, ते बऱ्याच वर्षांपासून राजकारणात आहे, ते चांगले खेळाडू आहे. तुम्ही यात पडू नका, आधी सकाळी झाले होते ना. आता संध्याकाळी होईल. तुम्ही या भानगडीमध्ये पडू नका. भाजपने जी काही प्रतिष्ठा कमावली आहे, ती धुळीला मिळवू नये. आमचे राजकीय मतभेद असले तरी चांगले संबंध आहे. त्यामुळे त्यांनी या फंद्यात पडू नये, निवडणुकीमध्ये पाहू या, उगाच तुम्ही फसाल. आम्ही आमचे पाहून घेऊ, असे राऊत म्हणाले.

दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊतांनी आजच्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महत्त्वपूर्ण निर्णय होणार असल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, आज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक बोलावली असून तिथे पक्षाच्या भविष्य़ आणि विस्ताराबाबत चर्चा होणार आहे. शिवसेना हा पक्ष देशात खूप मोठा पक्ष आहे. या पक्षाला बनवण्यासाठी आम्ही रक्त आटवले आहे. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे (Balasaheb Thackeray & Uddhav Thackeray) यांनी प्रचंड मेहनत घेऊन हा पक्ष उभा केला आहे. कुणाकडून पैसे घेऊन हा पक्ष उभा राहिलेला नाही, असे राऊत यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com