... अब सभी को सभी से खतरा है; संजय राऊतांचे सूचक ट्विट

... अब सभी को सभी से खतरा है; संजय राऊतांचे सूचक ट्विट

मुंबई । Mumbai

शिवसेनेच्या आमदारांनी (shivsena mla) बंडाळी करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची नामुष्की आणली होती. त्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाले. मात्र, त्यानंतर देखील नाट्यमय घडामोडी संपण्याचे नाव घेत नाही.

शिवसेनेचे बंडखोर आमदार शिवसेना पक्षप्रमुखांचे धोरण आणि संजय राऊतांकडून होणाऱ्या विधानांवर जोरदार टीका करत आहेत. तर संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेनेची बाजू मांडताना बंडखोर आमदारांना फैलावर घेत आहेत. त्यातच काल शिवसेना खासदारांच्या पक्षप्रमुखांसोबत झालेल्या बैठकीत खासदारांची राऊतांसोबत जोरदार खडाजंगी झाल्याची चर्चा होती. त्यानंतर आता संजय राऊत यांनी एक खळबळजनक ट्वीट केले आहे.

संजय राऊतांनी या ट्वीटमध्ये स्वत:चा फोटो शेअर करत त्यासोबत भारतातून पाकिस्तानमध्ये स्थलांतरीत झालेले सुप्रसिद्ध उर्दू कवी सय्यद हुसेन (Urdu poet Syed Hussain) उर्फ जॉन एलिया यांच्या काही ओळी ट्वीट केल्या आहेत. “अब नहीं कोई बात खतरे की, अब सभी को सभी से खतरा है..”, अशा ओळी संजय राऊतांनी ट्वीट केल्या आहेत.

दरम्यान, संजय राऊतांनी हे ट्विट देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सीएमओ महाराष्ट्र (CMO Maharashtra) उद्धव ठाकरे आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना टॅग केले आहे. त्यामुळे राऊतांच्या या ट्विटचा नेमका अर्थ काय? ते नेमका कुणाला इशारा देऊ इच्छिताहेत. नेमका कुणापासून कुणाला धोका आहे, असे प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com