…मग हा तमाशा का?; देवेंद्र फडणवीसांची चौकशी सुरु असताना संजय राऊतांचं ट्विट

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | Mumbai

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मुंबई पोलिसांनी बदली घोटाळा (Mumbai police transfer scam), फोन टॅपिंग प्रकरणाच्या (Phone tapping case) चौकशीसाठी नोटीस पाठवली होती. आणि त्यांना बीकेसीमधील सायबर पोलीस (Cyber ​​Police) स्टेशनमध्ये बोलावण्यात आलं होतं.

मात्र, गुन्हे शाखेच्या सहपोलीस आयुक्तांनी आपल्याला फोन करून स्वत: घरी येऊन जबाब नोंदवणार असल्याचं म्हटलंय, अशी माहिती फडणवीसांनी दिली होती. त्यानुसार, आज पोलिसांचं एक पथक देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी पोहोचलं आहे. ही चौकशी सुरु असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमधून संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर टीका केली आहे.

राऊत ट्वीट करत म्हणाले आहेत की, ‘कमाल आहे! काही लोक व काही राजकीय पक्ष स्वता:ला कायद्यापेक्षा मोठे का समजत आहेत? महाराष्ट्रात अनेक मंत्री आणि लोकप्रतिनधींनीना राजकीय सुडा पोटी केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीला बोलावले व ते हजर झाले.. लोकशाहीत विशेष अधिकार कोणालाच नसतो. कायद्यापुढे सगळे समान आहेत. मग हा तमाशा का?’

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *