मुंबई | प्रतिनिधी

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना इडीने समन्स बजावले आहेत. यापार्श्वभूमीवर शिवसेना भवनात खासदार राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले.

इडी, सीबीआय व आयकर विभागाने कारवाई करायचे म्हटले तर काहीतरी गांभीर्य असेल असे वाटायचे. पण गेल्या काही वर्षांपासून इडीची नोटीस देणे म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाने हस्तक्षेप करणे असे झाले आहे.

इडी आमच्यासाठी महत्वाचा विषय नाही. इडीची प्रतिष्ठा आता राहिली नसल्याची त्यांनी टीका केली.

ज्यांनी महाराष्ट्रात सरकार बनविण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्यामागे इडीचे कागदाचे पत्रके पाठवली जात आहे. राजकारणात समोरा समोर लढविण्याची ताकद नसल्याने भाजपकडून असे केले जात असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले.

काय म्हणाले संजय राऊत?

इडीची माहिती भाजपला कशी मिळते?

मला वारंवार धमकावण्याचा प्रयत्न

मला धमकावणारयांचा मी बाप आहे

भाजपच्या कार्यालयात इडीचे टेबल आहे काय ?

जो आरोप होतो तो व्यवहार १० वर्षांपूर्वीचा

हवं तर घरी येऊन अटक करा

इडीकडून मागणी झालेली वेळोवेळी कागदपत्रे आम्ही पोहोचवली आहेत

महिलांच्या अडून हल्ले करून नका समोरा समोर या

एचडीआयएलने भाजपला २० कोटी रुपये दिले

मी पवारांशी चर्चा करत आहे; चौकशीला जायचे की नाही ते ठरवू