Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याश्रीरामाचा धनुष्यबाण आणि हनुमानाची गदा आमच्याकडेच - संजय राऊत

श्रीरामाचा धनुष्यबाण आणि हनुमानाची गदा आमच्याकडेच – संजय राऊत

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आमच्याकडे श्री रामाचे धनुष्यबाण आणि हनुमानाची गदाही आहे. देवतांचा आशिर्वाद आमच्या पाठीशी आहे असे म्हणत कोल्हापूरमधील पोटनिवडणुकीत विजयाकडे वाटचाल करणाऱ्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कौतुक केले….

- Advertisement -

ते म्हणाले, विरोधकांचा भोंगा जनतेने नाकारला असून महाविकास आघाडी जनतेसमोर नवा पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. संजय राऊत दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी काळाराम मंदिरात दर्शनाला जाण्याआधी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, श्रीराम आणि हनुमानासारख्या दैवतांचा आशीर्वाद आमच्या पाठिशी आहे हे जनतेने कोल्हापूरच्या निवडणुकीत दाखवून दिले आहे. विरोधकांचा भोंगा जनतेने नाकारला असे म्हणत त्यांनी भाजप व मनसेनेवर टीका केली.

आज सकाळी त्यांनी पंचवटीतील ऐतिहासिक काळाराम मंदिरात आरती करुन दर्शन घेतले. यावेळी शिवसैनिकांनी जय श्री राम अशी तुफान घोषणाबाजी केली. तसेच मंदिराच्या नोंदवहीत यापुढे बटुकेश्वर मंदिरात हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा अभिप्रायदेखील लिहिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या