Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्या‘मलाही होती गुवाहाटीची ऑफर'; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

‘मलाही होती गुवाहाटीची ऑफर’; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

मुंबई | Mumbai

एकनाथ शिंदे शिवसेनेचे (Shiv Sena) मुख्यमंत्री नाही हे कालच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्पष्ट केले असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे मलाही गुवाहाटीला (Guwahati) जाण्याची ऑफर आली होती. मात्र, मी बाळासाहेबांना मानतो म्हणून गेलो नाही, असा खळबळजनक खुलासा राऊतांनी केला आहे…

- Advertisement -

यावेळी बोलतांना ते म्हणाले की, आपला जो अंतरात्मा असतो तो सांगतो, तू काही केले नाही, निर्भयपणे चौकशी यंत्रणांना सामोरे गेले पाहिजे. त्याच आत्मविश्वासाने मी गेलो आणि १० तासांनी बाहेर आलो. मलाही मार्ग होता गुवाहाटीला जाण्याचा. प्रयत्न झाले, आम्ही नाही गेलो. आम्ही बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, शिवसेना यांच्यासोबत राहिलो, असे राऊत म्हणाले.

तसेच ते पुढे म्हणाले की, स्वाभिमानाच्या गोष्टी करायच्या, हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या आणि असे वागायहचे, हे आमच्या रक्तात नाही. प्राण जाये, पर वचन ना जाये, हे आम्हाला बाळासाहेबांनी आणि हिदुत्वाने शिकवलेले आहे. मी या बाबतीत अत्यंत बेडर आहे. इतरांनाही मी सांगतो, जर सत्य तुमच्या बाजूने असेल, तर घाबरण्याची गरज नाही. मी काल अधिकाऱ्यांना सांगितले, बॅग भरुन आलोय आणि मी घाबरणार नाही. तुम्हाला जे हवेत ते प्रश्न विचारु शकता. तुम्ही तुमचे काम करा, मी माझे काम करतो.असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, शिंदे गटाकडून शिवसेनेची फसवणूक केली जात असून त्यांच्या मनात आपण आपल्या नेत्याला फसवल्याची खदखद आहे. तसेच लोकांना फसवणे ही भाजपाची पद्धत आहे. त्यामुळे शिवसेनेतून बाहेर पडलेले लोकही भाजपासारखेच वागत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. भाजपाला शिवसेनेची मुंबईतील ताकद कमी करायची आहे त्यामुळे ते शिंदे गटाच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवत असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या