‘वेट अँड वॉच’; ‘तो’ फोटो शेअर करत संजय राऊतांचे सूचक ट्विट

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई । Mumbai

राज्यात सध्या निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमध्ये (Political Situation) एकीकडे बंडखोर आमदारांच्या (Rebel MLA) अपात्रतेचा निर्णय अद्याप सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) प्रलंबित असताना दुसरीकडे राज्यात मंत्रीमंडळ विस्तार (Cabinet expansion) अजूनही रखडलेला आहे. त्यामुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाले असून सातत्याने राज्य सरकारला लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार (Shivsena MP) आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक सूचक ट्वीट करत राज्य सरकारला टोला लगावला आहे…

संजय राऊतांनी आज केलेल्या ट्विटमध्ये (Tweet) बहुमताचे पत्र राज्यपालांना (Governor) देत असतानाचा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि इतर भाजप (BJP) नेत्यांचा फोटो ट्विट केला आहे. या फोटोला त्यांनी सूचक कॅप्शनही दिले आहे. “उनकी मुस्कुराहट पर न जाना, दिआ तो कब्र पर भी जल रहा है!” असे त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे. तसेच कॅप्शनच्या शेवटी त्यांनी ‘वेट अँड वॉच’ असेही लिहिले आहे.

दरम्यान, संजय राऊतांच्या या ट्विटमुळे अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले असून आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाची टांगती तलवार असणाऱ्या शिंदे सरकारच्या (Shinde Government) भवितव्यावर आता चर्चा होऊ लागली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *