Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यासंजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत 'इतक्या' दिवसांची वाढ

संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत ‘इतक्या’ दिवसांची वाढ

मुंबई | Mumbai

पत्राचाळ घोटाळा (Patrachal Scam) प्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊतांच्या (ShivSena MP Sanjay Raut) न्यायालयीन कोठडीत (judicial Custody) पुन्हा एकदा १४ दिवसांची वाढ झाली आहे. त्यामुळे राऊतांचा कोठडीतील मुक्काम आणखी वाढला आहे.

- Advertisement -

आज संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी संपल्यामुळे त्यांना न्यायालयात (Court) हजर करण्यात आले होते. यावर सुनावणी घेण्यात आली असता ४ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. नियमित आणि जामीन अर्ज सुनावणी एकाच वेळी घ्यावी अशी विनंती राऊत यांच्या वकिलांनी केली होती. पंरतु कोर्टाने न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे.

दरम्यान, याआधी राऊत यांनी जामिनासाठी (Bail) विशेष न्यायालयात अर्ज केला होता. त्यानंतर राऊतांना विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता तेव्हा विशेष न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १९ सप्टेंबरपर्यंत वाढ केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या