जामीन मिळाल्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

जामीन मिळाल्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

मुंबई | Mumbai

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (Patra chawl land Scam) ईडीच्या कोठडीत (Arrested) असलेले शिवसेना (Shivsena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना आज तब्बल १०० दिवसांनंतर जामीन मंजूर झाला आहे. त्यानंतर आता स्वत राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे...

ते म्हणाले की, माझा न्यायदेवतेवर (Justice) पूर्ण विश्वास होता. मी न्यायदेवतेचे आभार मानतो. मी पुन्हा लढेन, असे राऊत यांनी म्हटले आहे. तसेच संजय राऊत जेलमधून थेट लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यासमोरील (Lokmanya Tilak Marg Police Station) हनुमान मंदिरात दर्शनासाठी जाणार असल्याचे समजते.

दरम्यान, राऊत सिद्धिविनायक मंदिर, बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ येथेही जाणार असून आज रात्री ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेण्याची शक्यता आहे. तर राऊतांच्या स्वागतासाठी आर्थर रोड जेल बाहेर पाच वाजता शिवसैनिकांकडून भव्य बाईक रैली काढण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com