... तर मी अटक व्हायला तयार - संजय राऊत

... तर मी अटक व्हायला तयार - संजय राऊत

मुंबई । Mumbai

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (patra chal scam case) शिवसेना (shivsena) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना साडे नऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीने (ED) ताब्यात घेतले आहे. यानंतर त्यांना पावणे सहा वाजेच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात आणले गेले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलतांना आपली प्रतिक्रिया दिली आहे...

यावेळी संजय राऊत म्हणाले की, ईडी मला अटक करणार असून मी अटक व्हायला तयार आहे. तसेच महाराष्ट्रात (Maharashtra) भाजपच्या विरोधकांवर राजकीय सुडाने कारवाया सुरू आहेत. त्याविरोधात माझ्यावरील कारवाईने बळ मिळेल. आमच्यासारखे काही लोक आहेत जे न झुकता, न डरता कारवायांना सामोरं जातात आणि लढाई लढतात, असा संदेश जाईल. अशा कारवायांच्या भीतीने अनेकजण पक्ष सोडून जातात, शरणागती पत्करतात. मात्र, संजय राऊत त्यातील नाही. मरेन पण झुकणार नाही, वाकणार नाही, शिवसेना सोडणार नाही,” असे राऊत यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “जी कारवाई व्हायची ती होऊ दे, मी घाबरत नाही. राजकीय सुडापोटी हा सर्व खेळ सुरू आहे. माझा पक्ष माझ्या पाठीशी आहे. उद्धव ठाकरे, शिवसैनिक यांचे माझ्यामागे बळ आहे. संजय राऊतला शिवसेनेमुळे राज्य व देश ओळखतो. संजय राऊत कधीच गुडघ्यावर चालत नाही, सरपटत नाही. निधड्या छातीने उभा राहतो आणि लढतो. त्यामुळे या कारवाईला देखील मी निधड्या छातीने सामोरे जाणार आहे. यातूनच महाराष्ट्राला बळ मिळेल असेही ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले, कोणतीही कागदपत्र माझ्याकडे सापडलेली नाहीत जे काय पत्राचाळ वगैरे म्हणतायेत कोणता पत्रा गंजलेला आहे की स्टीलचा आहे मला माहित नाही ती चाळ कुठे आहे मला माहित नाही तरी ठरलेले आहे की शिवसेना मोडायची तोडायची माझा आवाज बंद करायचा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना कमजोर करायचे त्यासाठी ही कारवाई सुरू आहे अशाने शिवसेना आणि महाराष्ट्र कमजोर होणार नाही माझ्यावरच्या कारवाईतून शिवसेना आणि महाराष्ट्राला लढण्याचे बळ मिळेल असेल तर मी माझे बलिदान द्यायला तयार आहे असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com