संजय राऊतांचा कोठडीतील मुक्काम वाढला

संजय राऊतांचा कोठडीतील मुक्काम वाढला

मुंबई | Mumbai

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl Scam) ईडीच्या (Ed) कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे...

संजय राऊत यांनी जामीन (Bail) मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यानंतर राऊत यांच्या अर्जावर आज सुनावणी (Hearing) झाली असता त्यावरील निकाल मुंबई सत्र न्यायालयाने (Bombay Sessions Court) राखून ठेवला आहे. तसेच सध्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून पुढील सुनावणी ९ नोव्हेंबरला होणार आहे.

दरम्यान, यावेळी न्यायालयात राऊतांच्या भेटीसाठी माजी मंत्री तथा आमदार अनिल परब (MLA Anil Parab) हे देखील आले होते. तसेच न्यायालयाच्या या निर्णयामुळे राऊत यांचा मुक्काम हा आर्थर रोड कारागृहामध्ये (Arthur Road Jail) हलविण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com