कोणत्याही लढाईशी दोन हात करण्यासाठी आम्ही समर्थ - संजय राऊत

कोणत्याही लढाईशी दोन हात करण्यासाठी आम्ही समर्थ - संजय राऊत

नवी दिल्ली । New Delhi

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्याने शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडली आहे. त्यानंतर आता शिवसेनेच्या लोकसभेतील एकूण १८ खासदारांपैकी १४ खासदार शिंदे गटात (Shinde Group) दाखल होणार असल्याची चर्चा सुरु आहे. तसेच हे १४ खासदार काल शिंदे गटाच्या बैठकीसाठी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते अशी माहितीही समोर आली होती. यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधत या खासदारांवर निशाणा साधला आहे...

यावेळी बोलतांना संजय राऊत म्हणाले की, लढाई कोणतीही असुद्या चिन्हाची असो नाहीतर निवडणुकीची असो आम्ही समर्थ आहोत. भाजपला महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत. त्यासाठी शिवसेना फोडण्याचे काम सुरू आहे. पण यामुळे शिवसेनेची (ShivSena) ताकद कमी होणार नाही. आमदार, खासदार ही शिवसेनेची ताकद नाही. शिवसेनेची ताकद रस्त्यावर आहे. भाजपला महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत, असा आरोपही राऊत यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले की, ५० आमदारांच्या (MLA) घरावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावलाच होता आता खासदारांच्या (MP) घरावरीही लावण्यात आला आहे. पोलीस (Police) बळाचा वापर केला जात आहे, पैशाचा वापर आणि ब्लॅकमेलिंगही केले जात आहे. कोणत्याही परिस्थितीशी संघर्ष करायला सामना करायला बाळासाहेबांची शिवसेना तयार आहे. मुख्यमंत्री दिल्लीत आले असतील तर तो त्यांचा नियमित दौरा आहे. ते भाजपचे (BJP) मुख्यमंत्री आहेत. त्यांचे हायकमांड येथे आहे. मंत्रिमळ तयार करायचे आहे, नावे अंतिम करायची आहे, तर यावे लागेल. मी शिवसेनेचे दोन मुख्यमंत्री पाहिले आहेत, ते कधी मंत्रिमंडळाची यादी घेऊन किंवा सरकार स्थापनेसाठी दिल्लीत आले होते हे माहित नाही. त्या काळी सर्व चर्चा मुंबईत होत होती. ते कोणते प्रश्न घेऊन येथे आले असतील तर टीका करणार नाही, असे राऊत म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, शिवसेना भवन (Shivsena Bhavan) ही शिवाई ट्रस्टची संपत्ती आहे. सामना ही प्रबोधन ट्रस्टची संपत्ती आहे. बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) ज्या व्यवस्था करून ठेवल्या आहेत, त्या व्यवस्थेनुसार ते चालतंय. त्यांना महाराष्ट्र तोडायचा आहे, म्हणून शिवसेना तोडायची आहे. उद्या म्हणतील मातोश्रीतही जातो. यांचा काही भरवसा नाही. भांग प्यायलेली माणसे काहीही करू शकतात. नशेची, सत्तेची भांग जे पितात ते काही करतात. उद्या म्हणतील बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेने स्थापन केली नाही असेही म्हणतील. त्यांची वैचारीक पातळी एवढी गेली आहे. बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही असेही म्हणू शकतात. अशी त्यांची वक्तव्य आहेत. ठाकरेंची शिवसेना इतक्या सहजासहजी हार आणि शरण जाणार नाही. हे माहीत असल्याने लोकांना भ्रमित करण्यासाठी विधाने केली जात असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com