Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यादोघांचे मंत्रिमंडळ म्हणजे...; राऊतांचा शिंदे - फडणवीस सरकारवर हल्लाबोल

दोघांचे मंत्रिमंडळ म्हणजे…; राऊतांचा शिंदे – फडणवीस सरकारवर हल्लाबोल

मुंबई । Mumbai

महाराष्ट्राचा (Maharashtra) कारभार अत्यंत बालिशपणे सुरू असून राज्यात मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही. तसेच जगात कुठे दोघांचे मंत्रिमंडळ कोणी पाहिले आहे का? दोघांचे कॅबिनेट हा चेष्टेचा विषय झाला असून याआधी महाराष्ट्राची अशी चेष्टा झाली नव्हती, असे म्हणत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे…

- Advertisement -

संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी दिल्लीत पोहचताच शिवसेना खासदार (Shivsena MP) संजय राऊत यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर तोफ डागली आहे. ३० जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला. त्यानंतर आता १६ दिवस उलटून गेले तरीही राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. दर दोन-तीन दिवसांनी नवी तारीख मिळतानाची चर्चा सुरू असते. त्यामुळे या मुद्द्यावर राऊत यांनी शिंदे सरकारला (Shinde Government) धारेवर धरले आहे.

तसेच राऊतांनी यावेळी संभाजीनगर (Sambhajinagar) धाराशिव (Dharashiv) ही नावं देणं लोकभावना आहे, त्याबाबत ठाकरे सरकारने (Thackeray Government) निर्णय घेतला होता तो निर्णय हे सरकार कसे रद्द करू शकते? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. तसेच राज्यपालांनी (Governor) बहुमत सद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर घेतलेल्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तीन नामांतरांचा निर्णय घेतला होता. मात्र तो निर्णय कायदेशीर नसल्याचे सांगत शिंदे आणि फडणवीसांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत पुन्हा तो निर्णय घेतला आहे. त्यावरुन संजय राऊत यांनी सराकरला लक्ष्य केले आहे.

दरम्यान, राऊतांनी राज्यातील शिंदे सरकारला मिळालेले बहुमत हे पाकिटमारीतून मिळाले असल्याची टीकाही केली आहे. तसेच राऊत हे सरकार बेकायदेशीर असल्याचे सातत्याने सांगत आहेत. जोपर्यंत अपात्र आमदारांबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) होत नाही, तोपर्यंत झालेला शपथविधी, विश्वासमत ठराव हे सर्व बेकायदेशीर असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या