Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यासंजय राऊतांना दिलासा नाहीच; पुढील सुनावणी 'या' तारखेला

संजय राऊतांना दिलासा नाहीच; पुढील सुनावणी ‘या’ तारखेला

मुंबई | Mumbai

पत्राचाळ घोटाळयाप्रकरणी (Patra Chawl scam) अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याने त्यांचा कोठडीतील (Custody) मुक्काम पुन्हा एकदा वाढला आहे…

- Advertisement -

आज राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती. त्यासाठी राऊत यांना पीएमएलए (PMLA) न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने (Court) पुढील सुनावणी १७ ऑक्टोबरला होणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने (ED) जून महिन्यात अटक (Arrested) केली होती. त्यानंतर राऊत यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली होती. तेव्हापासून राऊत यांचा मुक्काम हा आर्थर रोड कारागृहामध्ये हलवण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या