राज्यपालांच्या 'त्या' वक्तव्यावरून राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल

राज्यपालांच्या 'त्या' वक्तव्यावरून राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल

मुंबई । Mumbai

महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) विशेष करून मुंबई (Mumbai) आणि ठाण्यातून (Thane) गुजराती किंवा राजस्थानी लोकांना काढू टाकले तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाही, असे वक्तव्य राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केले आहे. यावरुन आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे. राऊत यांनी राज्यपालांचा हा वादग्रस्त व्हिडीओ ट्वीट करत टीका केली आहे....

संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, “महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला. स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपालांचा साधा निषेध तरी करा. मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे. असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा (BJP) डाव असल्याचा आरोप शिवसेनेकडून (Shivsena) वारंवार केला गेला आहे. तसेच राज्यपालांच्या या विधानावरुन आता राजकारण चांगलेच तापले असून विरोधकांकडून या वक्तव्याचा निषेध केला जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com