संजय राऊत जेजे रुग्णालयात; शिवसैनिकांची मोठी गर्दी

संजय राऊत जेजे रुग्णालयात; शिवसैनिकांची मोठी गर्दी

मुंबई | Mumbai

पत्राचाळ घोटाळ्यात काल रात्री शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने अटक केली आहे. यानंतर त्यांना आज वैद्यकीय चाचणीसाठी जेजे रुग्णालयात नेण्यात आले असून त्यानंतर मुंबई सत्र न्यायालयातील (Bombay Sessions Court) पीएमएलए कोर्टात (PMLA Court) हजर केले जाणार आहे...

यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून (Police) खबरदारी घेतली आहे. ईडी कार्यालय (ED Office) तसेच जे. जे. हॉस्पिटल (J. J. Hospital) परिसर आणि मुंबई सेशन कोर्टबाहेर कडेकोट सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, दक्षिण मुंबईत एकूण चार ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे. जवळपास २०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ईडी कार्यालयबाहेर १०० पोलीस तैनात असून ५० पोलीस जेजे रुग्णालयाबाहेर आणि जवळपास ५० पोलीस सेशन कोर्टाच्या परिसरात तैनात आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com