Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यायुतीसाठी संजय राऊतांचा खोडा; खा.राहुल शेवाळेंचे अनेक गौप्यस्फोट

युतीसाठी संजय राऊतांचा खोडा; खा.राहुल शेवाळेंचे अनेक गौप्यस्फोट

नवी दिल्ली । New Delhi

एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख (ShivSena chief) उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शिवसेना खासदारांना युतीसाठी ग्रीन सिग्नल दिला होता परंतु खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी खोडा घातला असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे (Shinde Group) गटनेते खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी केला आहे. तसेच मला पण युती करायची आहे, मी माझ्या परीने खूप प्रयत्न केला.आता तुम्ही तुमच्या पातळीवर प्रयत्न करा असे उद्धव ठाकरे म्हणाल्याचे शेवाळे यांनी सांगितले…

- Advertisement -

यावेळी शेवाळे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे गेल्यावर्षी जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या भेटीसाठी दिल्लीला (Delhi) गेले होते. तेव्हा तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाणही (Ashok Chavan) सोबत होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांकडे वेळ मागितली आणि एक तास दोघांमध्ये बंद दाराआड युतीबाबत चर्चा झाल्याचे राहुल शेवाळे यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, ज्यावेळी एकनाथ शिंदे आणि आमदारांनी वेगळी भूमिका घेतली त्यावेळी आम्हा सर्व खासदारांना वर्षा बंगल्यावर (Varsha Bungalow) बैठकीसाठी बोलावले होते. २१ जून रोजी ही बैठक झाली होती. तेव्हाही आम्ही आमची स्पष्ट भूमिका मांडली होती. त्यावेळी स्वत: उद्धव ठाकरेंनी जर एकनाथ शिंदे यांना भाजपने (BJP) मुख्यमंत्री केले तर नक्कीच मी तुमच्या भूमिकेचे स्वागत करेन आणि युती करू असे आश्वासन दिले होते. त्यामुळेच आम्ही तेव्हा तयार झालो. या बैठकीला तेव्हा संजय राऊत, अरविंद सावंत (Arvind Sawant) आणि इतर खासदारही उपस्थित होते, असेही शेवाळे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी २०१९ च्या लोकसभेवेळी जो वचननामा (affidavit) लिहिला होता त्याच वचननाम्यावरुन आम्ही लोकसभेची निवडणूक (Lok Sabha election) लढवली होती. या निवडणुकीत आम्ही प्रचंड मतांनी विजयी झालो. पण दुर्देवाने नंतर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) स्थापन झाली. या महाविकास आघाडीचा कॉमन मिनिमम प्रोग्रॅम बनवण्यात आला. या प्रोग्रॅममध्ये शिवसेनेच्या वचननाम्याबद्दल काहीच नव्हते. संभाजीनगर (Sambhajinagar) विषयी कॉमन मिनिमम प्रोगॅममध्ये कुठेही उल्लेख नव्हता, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) स्वत: म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्व आणि बाळासाहेबांचा विचार पुढे नेला आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व खासदार इथे उपस्थित आहोत. आम्ही एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारलेले आहे, असेही राहुल शेवाळे यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या