या आमदाराने जनतेसाठी मोडली तब्बल ९० लाखांची FD

या आमदाराने जनतेसाठी मोडली तब्बल ९० लाखांची FD

हिंगोली :

अनेक लोकप्रतिनिधी जनतेसाठी धावून जातात. त्यांना हवी ती मदत करतात. परंतु स्वत:च्या खिश्याला झळ बसू देत नाही. परंतु राज्यातील एका आमदाराने जनतेसाठी थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ९० लाखांची मुदत ठेवीची (fixed deposit)पावती मोडली. त्या आमदाराने ९० लाख रेमडेसिविर आपल्या मतदार संघासाठी इंजेक्शन मिळवले.

Title Name
चांगली बातमी : महाराष्ट्रात विक्रमी दीड कोटी लसीकरण
या आमदाराने जनतेसाठी मोडली तब्बल ९० लाखांची FD

हिंगोलीतील कळमनुरी मतदारसंघाचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी लोकप्रतिनिधी कसा असावा? याचा पायंडा पाडून दिला. हिंगोली जिल्ह्यातील रेमडेसिविर इंजेक्शनचा स्टॉक संपला. ही इंजेक्शन मागवण्यासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता होती आणि सरकारी कामासाठी इतकी मोठी रक्कम कशी गुंतवायची असा प्रश्न पडल्याने कोणीही दुकानदार पुढे येईना. कारण सरकारी कामांना होणार विलंब आणि व्याजाचा बसणार भुर्दंड या गोष्टी लक्षात घेऊन अनेकांनी त्याला नकार दिला. ही बाब आमदार संतोष बांगर यांच्या कानावर पडली त्यांनीही प्रशासकीय चाकोरीला मुरड घालून ऑर्डर देण्याचे प्रयत्न केले. मात्र याला यश आले नाही.

Title Name
हनुमानाचा जन्म कुठे? आंध्र प्रदेशात, कर्नाटकात की अंजनेरीत
या आमदाराने जनतेसाठी मोडली तब्बल ९० लाखांची FD

मग मोडली स्वत:ची एफडी

सरकारी स्तरावर प्रयत्न केल्यानंतरही रक्कम विक्रेत्याला देता आली नाही. यामुळे संतोष बांगर यांनी स्वतःची ९० लाखांची एफडी मोडून एका खासगी वितरकाला तब्बल ५००० रेमडेसिविर इंजेक्शनची ऑर्डर दिली. आता जेव्हा सरकारी कामाकाजानुसार वितरकाला जेव्हा पैसे मिळतील तेव्हा बांगर यांना त्यांची गुंतवलेली रक्कम परत मिळेल. पण जनतेसाठी ९० लाखांची एफडी मोडणारा लोकप्रतिनिधी विरळच.

काय म्हणाले आमदार

‘हिंगोली जिल्ह्यास १० हजार रेमडेसिविर इंजेक्शन हवे होते. पण या इंजेक्शन्ससाठी लागणारी रक्कम तात्काळ उभी करण्यास प्रशासनाला यश आले नाही. यामुळे माझ्या खात्यावर ९० लाखांची एफडी होती. ती मी मोडली अन् आखरे मेडिकल यांच्या खात्यावर RTGS ने रक्कम जमा केली,' अशी माहिती आमदार संतोष बांगर यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com