शिवसेना आमदार म्हणाले, फडणवीसांच्या तोंडात कोरोनाचे जंतू कोंबले असते...

शिवसेना आमदार म्हणाले, फडणवीसांच्या तोंडात कोरोनाचे जंतू कोंबले असते...
देवेंद्र फडणवीसराजकीय

बुलढाणा

शिवसेना आमदाराची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यांवर टीका करतांना जीभ घसरली. फडणवीसांचा शेलक्य शब्दात उल्लेख करत आमदार संजय गायकवाड म्हणाले, “मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते. फडणवीसांनी कोरोनावरुन राजकारण करु नये,” असा इशाराही त्यांनी दिला.

शनिवारी बुलढाण्यात आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकारण रंगण्याची चिन्ह आहे. आमदार गायववाड म्हणाले, “ केंद्रातील नरेद्र मोदी सरकार महाराष्ट्राला मदत करायचे सोडून बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळला मदत करत आहे. गुजरातला इंजेक्शन मोफत वाटले. कोरोना काळात मदत करण्याचे सो़डून भाजप राजकारण करत आहे. ” यावेळी त्यांनी एकेरी भाषेचा वापर करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर यांचा खरपूस समाचार घेतला.

माणसेच जिवंत राहिली नाही तर तुम्हाला मतदान कोण करणार असा प्रश्न तुम्ही सरकारला विचारत आहात. त्याशिवाय तुम्ही तर सरकार पाडायला निघाले आहात. मात्र अगोदर माणसे जिवंत ठेवा, मगच राजकारण करा, असे आवाहनही गायकवाड यांनी भाजपला केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com