आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा, म्हणाले...

आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा, म्हणाले...

मुंबई | Mumbai

माजी मंत्री तथा आमदार आदित्य ठाकरे (MLA Aditya Thackeray) आज रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून शिवसंवाद यात्रेच्या (Shivsamvad Yatra) निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलतांना त्यांनी शिंदे गटातील आमदारांवर (Shinde Group MLA) पुन्हा एकदा निशाणा साधला आहे...

यावेळी ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात (Maharashtra) खोके सरकार स्थापन होऊन जवळपास अडीच ते तीन महिन्यांचा कालावधील उलटला. मात्र, तरी देखील हे सरकार एक सुद्धा असे काम ठळकपणे दाखवू शकले नाही की ते आम्ही केलेले आहे. तसेच मी आतापर्यंत सतत सांगत आलेलो आहे की हे गद्दारांचे सरकार आहे, बेईमानीचे सरकार आहे, घटनाबाह्य सरकार आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठित खंजीर खुपसणारे सरकार आहे. हे सिद्ध करून दाखवतो असेही ते म्हणाले.

आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा, म्हणाले...
३० प्रवाशांना घेऊन जाणारी बस उलटली

पुढे ते म्हणाले की, तुमच्यात हिंमत होती तर समोरून यायला पाहिजे होते. असे गद्दारांसारखे मागून पाठीत वार करायला नको होता. म्हणे आमच्या बंडाची (Rebellion) नोंद ३३ देशांनी घेतली. पण तुमच्या बंडाची नाही, गद्दारीची नोंद ३३ देशांनी घेतली आहे. महाराष्ट्राने तर चांगलीच नोंद घेतली आहे. यांना उठाव करायचा असता, तर जागेवरच उभे राहिले असते. पण हे पळून गेले, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी चांगलीच फटकेबाजी केली.

आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा, म्हणाले...
नाशिक-मुंबई महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

ते पुढे म्हणाले की, तुम्ही ४० जण राजीनामा (Resignation) द्या आणि मी पण राजीनामा देतो. पुन्हा निवडणूक लढवू मी सुद्धा निवडणूक लढविण्यास तयार आहे. तसेच महाराष्ट्राची परिस्थिती तुम्ही बदलवून टाकली असून हे खोके सरकार फक्त बघत बसलेले आहे. यांची राजीनामा देण्याची हिंमत नाही, पुन्हा निवडणुकीला सामोरे जायची हिंमत नाही, असे आव्हानही ठाकरेंनी यावेळी शिंदे गटाला दिले.

आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा, म्हणाले...
किरकोळ वादातून तरुणावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com