Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यामहाराष्ट्रात राजकीय भूकंप; एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे अनेक नेते नॉट रिचेबल

महाराष्ट्रात राजकीय भूकंप; एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे अनेक नेते नॉट रिचेबल

मुंबई | Mumbai

विधान परिषद निवडणुकीनंतर (Legislative Council elections) शिवसेना नेते (Shivsena Leader) आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अनेक आमदारांना घेऊन गुजरातमध्ये (Gujarat) पोहोचले आहे. आज दुपारी 2 वाजता एकनाथ शिंदे पत्रकार परिषद (Press conference) घेऊन आपली बाजू मांडणार आहे….

- Advertisement -

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचा विजय झाला मात्र काही आमदार फुटले. अचानक एकनाथ शिंदे नाराज असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर एकनाथ शिंदे थेट गुजरातमधील सुरतमध्ये पोहोचले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक शिवसेनेचे आमदार असल्याचे समजते. तर राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल आहेत.

विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर; ‘हे’ उमेदवार विजयी

हे आमदार भाजपच्या (BJP) संपर्कात असल्याचे समजते. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील या आमदारांसाठी सर्व नियोजन करत असल्याची माहिती मिळत आहे.

कोणते नेते नॉट रिचेबल

अब्दुल सत्तार

शंभूराज देसाई (गृह राज्यमंत्री)

माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी)

संजय शिरसाठ,

रमेश बोरणारे,

संजय राठोड,

प्रताप सरनाईक,

बालाजी किणीकर,

श्रीनिवास वनगा,

शांताराम मोरे,

प्रकाश सुर्वे,

विश्वनाथ भोईर,

उदयसिंग राजपूत,

शांताराम मोरे,

बातमी अपडेट होत आहे….

- Advertisment -

ताज्या बातम्या