नाशकात अचानक अर्धा डझन मंत्र्यांची मांदियाळी

नाशकात अचानक अर्धा डझन मंत्र्यांची मांदियाळी

नाशिक | Nashik

नाशिकमध्ये आज अर्धा डझन मंत्र्यांची मांदियाळी आहे. दोन वेगवेगळ्या विवाह समारंभाच्या निमित्ताने हे मंत्री आज नाशिक दौऱ्यावर येत आहेत. गंगापूर रोड (Gangapur Raod) वर पार पडणाऱ्या विवाह समारंभास (Wedding Ceremony) हे मंत्री उपस्थित राहणार आहेत...(Shivsena leader on nashik tour)

आज नाशिकमध्ये जिल्हा परीषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर (ZP President Balasahbe Kshirsagar) यांच्या कन्येचा विवाह आहे. तसेच आमदार उदयसिंग राजपुत (MLA Udaysing Rajput) यांच्या पुत्राचेही आज लग्न आहे.

त्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), कृषीमंत्री दादाजी भुुसे (Dadaji Bhuse), महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar), रोहयो मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.

तसेच शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांंचेही नाशिक मध्ये आगमन झाले आहे. मंत्री व पदाधिक़ार्‍यांच्याा दौर्‍यामुळे प्रशासनावरील तान चांगलाच वाढला आहे. विशेष म्हणजे लग्नसोहळे आटोपुन मंत्री तातडीने रवानाही होणार असल्याचे समजते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com