Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याबाबांनो! आमदारकी मिळो न मिळो...

बाबांनो! आमदारकी मिळो न मिळो…

देवळाली कॅम्प | वार्ताहर

नाशिकचे निष्ठावान शिवसैनिक विजय करंजकर यांचे नाव शिवसेनेच्या कोट्यात आल्यामुळे नाशिकला वरिष्ठ सभागृह म्हणजेच विधान परिषदेचे सदस्यत्व मिळणार असल्याची चर्चा आहे. यादीत नाव आल्यानंतर विजय करंजकर यांनी देशद्तला प्रथमच एका व्हिडीओ द्वारे प्रतिक्रिया दिली आहे…

- Advertisement -

ते म्हणाले, दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादामुळेच शिवसैनिक म्हणून घेताना अनेक पद बहाल केली. शहरप्रमुख पदापासून जिल्हाध्यक्षही मी झालो. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझे नाव विधानपरिषद सदस्य म्हणून घेतल्याने मी भारावलो आहे. आमदार होवो न होवो पण यादीत नाव आल्यामुळे आनंद झाला आहे.

लोकसभा निवडणुकीत तिकीट डावलल्यानंतर करंजकरांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वरिष्ठ सभागृहात संधी दिल्याचे बोलले जात आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांसाठी उमेदवारांच्या नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली. या यादीतील काही नावे समोर आली. यामध्ये शिवसेनेच्या यादीत विजय करंजकर यांचे नाव समोर आले आहे.

कोण आहेत विजय करंजकर?

शिवसेनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष. करंजकर यांनी तरुण वयात शिवसेनेत प्रवेश केला. लहान कार्यकर्ता ते जिल्हाअध्यक्ष हा मोठा प्रवास त्यांनी केलाय. नाशिकला दोन वेळा शिवसेनेचा खासदार निवडून देण्यातही करंजकरांचा मोठा वाटा मानला जातो.

2001 ते 2006 भगूर नगराध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. 2011 पासून ते जिल्हा प्रमुख म्हणून जबाबदारी पार पडत आहेत. तसेच 2001 पासून शिवसेनेची भगूर नगरपालिकेवर एक हाती शिवसेनेची सत्ता आहे.

करंजकर सुरुवातील उपशाखाप्रमुख, उपशहरप्रमुख, शहरप्रमुख, त्यानंतर नगरसेवक, नगराध्यक्षपर्यंतची पदे त्यांनी भूषवले आहेत. शिवसेनेचे जिल्हाध्यक्षम्हणून धुरा त्यांच्याकडे सोपवली गेल्यानंतर शिवसेनेचे नाशकात संघटन बळकट करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना विधानपरिषदेवर पाठवण्यात येणार आहे. तर याशिवाय सेनेचा बुलंद आवाज आणि शिवव्याख्याते नितीन बानुगडे पाटील यांनाही सेनेने विधानपरिषदेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रकांत रघुवंशी यांचाही समावेश आहे.

हे आहेत शिवसेनेचे संभाव्य सदस्य

1) उर्मिला मातोंडकर

2) नितीन बानगुडे पाटील

3) विजय करंजकर

4) चंद्रकांत रघुवंशी

- Advertisment -

ताज्या बातम्या