विभक्त पतीच्या शिंदे गटातील प्रवेशावर सुषमा अंधारे, म्हणाल्या...

विभक्त पतीच्या शिंदे गटातील प्रवेशावर सुषमा अंधारे, म्हणाल्या...

मुंबई | Mumbai

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे (Vaijnath Waghmare) हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. वाघमारे यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे सुषमा अंधारे बॅकफूटवर येतील असे बोलले जात आहे. मात्र, हे सर्व दावे अंधारे यांनी फेटाळून लावले आहेत...

त्या म्हणाल्या, की 'माझे पती आणि मी गेली ५ ते ६ वर्षांपासून विभक्त आहोत. शिंदे गटातील (Shinde Group) प्रवेश हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. मी त्यांच्या कारकिर्दीला शुभेच्छा देईल. ते राजकारणात होते की नाही मला माहीत नाही. त्यांचे नेमकं काय चाललं होतं हेही मला माहीत नाही, असे अंधारे यांनी सांगितले.

तसेच प्रत्येकाचे वैयक्तिक आयुष्य असते. प्रत्येकाचा भूतकाळ असतो. तो कुरतडण्याचे कारण नाही. भावना गवळी (Bhavna Gawali) शिंदे गटात आहेत. त्यांचे पती कॅप्टन सुर्वे आमच्या पक्षात आहे. गजानन कीर्तिकर शिंदे गटात आहेत. तर त्यांचे चिरंजीव आमच्या पक्षात आहेत. त्यामुळे या टॅक्टिस केवळ राजकीय टॅक्टिस म्हणून पाहते, असे त्यांनी स्पष्ट केले.

पुढे त्या म्हणाल्या की, वैजनाथ वाघमारे यांच्याकडे काही असेल तर मला माहीत नाही. माझे आयुष्य मी स्वाभिमानाने जगते. महिला म्हणून आपण रडतखडत बसावे असे वाटत नाही. प्रत्येक गोष्टी सहन करण्याची माझी तयारी आहे. मी मेंटली तयार आहे. येणारा प्रत्येक वार झेलायला मी तयार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com