Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याआम्हाला बहुमत चाचणीची चिंता नाही - एकनाथ शिंदे

आम्हाला बहुमत चाचणीची चिंता नाही – एकनाथ शिंदे

मुंबई । Mumbai

शिवसेना नेते (shivsena leader) एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी पक्षातील बंडखोर व अपक्ष आमदारांसह गुवाहाटीतील (Guwahati) कामाख्या देवीचे (Kamakhya devi) आज दर्शन घेतले. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली…

- Advertisement -

यावेळी बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले की, उद्या आम्ही सर्व आमदार मुंबईत (mumbai) पोहोचणार असून आमच्याकडे दोन तृतीयांशहून अधिक आमदार (mla) आहेत. त्यामुळे आम्हाला बहुमत चाचणीची चिंता नसून आम्ही बहुमत चाचणीत पास होऊ. तसेच आम्हाला मुंबईत येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. लोकशाहीत क्रमांक आणि बहुमताला महत्व असते. या देशात संविधान, कायदा आणि नियमाच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.

तसेच यावेळी त्यांना बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाणार का? असे विचारण्यात आले असता ते म्हणाले की, “बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरही जाणार छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर आनंद दिघेंनाही वंदन करणार. ही बाळासाहेब ठाकरेंची, हिंदुत्वाला पुढे नेणारी, आनंद दिघेंचं विचार पुढे नेणारी शिवसेना आहे. महाराष्ट्र हे जनतेचे राज्य असून त्याचा विकास करण्यासाठी, प्रगतीपथावर नेण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना हा हिंदुत्वाचा मुद्दा पुढे नेत आहोत असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राज्यपालांनी (Governor) ठाकरे सरकारला (Thackeray government) उद्याच (३० जूनला) बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली आहे. आज सकाळी ११ वाजता या याचिकेवर प्रथम सुनावणी झाली. त्यानंतर उर्वरित सुनावणी ही संध्याकाळी ५ वाजेपर्यंत होणार आहे. आजच दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व कागदपत्र सादर करण्याचे आदेश शिवसेनेला सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. शिवसेनेकडून वकिल अभिषेक मनू सिंघवी (Advocate Abhishek Manu Singhvi) यांनी न्यायालयात युक्तिवाद केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या