बंडखोर आमदारांचा आकडा वाढणार; आमच्यासोबत सध्या ४६ आमदार

एकनाथ शिंदे यांची एका वृत्तवाहिनीला माहिती
बंडखोर आमदारांचा आकडा वाढणार;  आमच्यासोबत सध्या ४६ आमदार

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

सध्या आमच्याकडे ४६ आमदार आहेत. आणखी हा आकडा वाढणार आहे. उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) आणि रश्मी ठाकरे (Rashmi Thackery) यांच्याशी माझे बोलणे झाले. मात्र, आम्ही सर्व आमदार (MLA) हिंदुत्वाशी एकनिष्ठ आहोत असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी फोनवर चर्चा करत होते....

आज सकाळी गुवाहाटीमध्ये अपक्षांसह एकूण ४० आमदार असल्याचे सांगण्यात आले होते. याच वेळी आणखी आमदार आज गुवाहाटीला येतील अशी माहितदेखील समोर आली होती. यानुसार आज दुपारपर्यंत आणखी सहा आमदारांची यात भर पडलेली दिसून येत आहे.

गुलाबराव पाटील नॉटरिचेबल

सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील हे गुवाहाटीकडे रवान झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे आणखी एक बडा नेते शिंदे गटात सहभागी होणार असल्यामूळे हा मोठा धक्का शिवसेनेला मानला जात आहे.

आदित्य ठाकरे अनुपस्थित

आज दुपारी कॅबिनेटची महत्वाची बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे अनुपस्थित असल्याचे समोर येत आहे. थोड्याच वेळेपूर्वी आदित्य यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवरून पर्यावरण मंत्री शब्द काढून टाकल्याचे दिसून आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com