Video : किशोरी पेडणेकर म्हणाल्या, 'या' महिन्यात निवडणुकांचे निकाल लागलेले असतील

Video : किशोरी पेडणेकर म्हणाल्या, 'या' महिन्यात निवडणुकांचे निकाल लागलेले असतील

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी Trimbakeshwar

मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (shivsena leader kishori pedanekar) आज त्र्यंबकराजाच्या चरणी लिन झाल्या. याप्रसंगी माध्यमांशी वार्तालाप करताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील निवडणुका कधी होतील याबाबतचे भाकीत वर्तवले आहे...(kishori pedanekar worship in trimbakeshwar temple)

त्या म्हणाल्या, की जरी सर्वोच्च न्यायलयाने (Supreme court) आदेश दिला असेल तरीदेखील अंदाजे ऑक्टोबर महिना निवडणुका पूर्ण व्हायला उजाडेल असे दिसते आहे. जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाळा असतो. संततधार पावसाच्या (rainy season) दिवसांत निवडणुका घेणे शक्य नसते.

मात्र, ग्रामपंचायत निवडणुकांना (Grampanchayat Elections) परवानगी याकाळात मिळू शकते. परंतु, जर बळीराजा जो खरा मतदार आहे तोच मतदानाला नसेल तर निवडणुका घ्यायच्या कशा असाही प्रश्न उपस्थित राहतो आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीला खरीपाची तयारी करावी लागणार आहे. त्यामुळे बळीराजा व्यस्त आहे, ठिकठिकाणी तर खरीपाची सुरुवातच मे महिन्याच्या अखेरीस होऊन जाते.

त्यामुळे बळीराजाला निवडणुकीसहभागी होणे याकाळात कठीण आहे. आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे खऱ्या अर्थाने लक्ष लागून असल्याचे पेडणेकर म्हणाल्या.

Related Stories

No stories found.