शिवसेनेला पुन्हा धक्का! अर्जुन खोतकर शिंदे गटाच्या वाटेवर

शिवसेनेला पुन्हा धक्का! अर्जुन खोतकर शिंदे गटाच्या वाटेवर

नवी दिल्ली । New Delhi

राज्यात शिवसेनेला (Shivsena) मोठे खिंडार पडले असून दररोज नगरसेवकांसह पदाधिकारी शिंदे गटात (Shinde Group) दाखल होत आहे. शिवसेनेच्या ४० आमदारासंह (MLA) १२ खासदार (MP) शिंदे गटात दाखल झाल्यानंतर आता शिवसेनेचे जालन्याचे माजी आमदार अर्जुन खोतकर (Former MLA Arjun Khotkar) हे सुद्धा शिंदे गटात दाखल होणार असल्याची चर्चा आहे...

मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन खोतकर हे मागील आठवडाभरापासून दिल्लीत मुक्कामी असून त्यांनी या आठवडाभरात भाजपच्या नेत्यांसह वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी घेतल्या आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे देखील आज दिल्लीत (Delhi) असून ते सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांच्यासह देशाच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या शपथविधी सोहळ्याला संसद भवनात (Parliament House) उपस्थित होते.

शपथविधी सोहळा आटोपल्यानंतर दिल्लीत भाजपच्या खासदारांसह (BJP MP) शिवसेनेच्या खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी या खासदारांसोबत शिवसेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकरांनी सुद्धा शिंदेंची भेट घेतल्याने तेही शिंदे गटात सामील झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

दरम्यान या भेटीच्या वेळी भाजपचे नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि अर्जुन खोतकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दिलजमाई झाल्याचे बोलले जात आहे. सेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकाराने दानवे आणि खोतकर पुन्हा एकदा एकत्र आले आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) यांनी संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar) शिवसंवाद यात्रा (Shivsanvad Yatra) काढली होती. त्यावेळी खोतकर हे ठाकरे यांच्यासोबत दिसले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com