विधानपरिषद निवडणूक : शिवसेनेच्या 'या' नावांची चर्चा

विधानपरिषद निवडणूक : शिवसेनेच्या 'या' नावांची चर्चा

मुंबई । Mumbai

राज्यात एकीकडे राज्यसभा निवडणुकीवरून (Rajya Sabha elections) वातावरण तापलेले असतानाच आता विधानपरिषद निवडणुकांसाठी (Legislative Council Elections) देखील हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातच शिवसेनेकडून (shivsena) विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी तीन जणांची नावे चर्चेत असल्याची माहिती समोर आली आहे...

मिळालेल्या माहितीनुसार, विधानपरिषदेच्या शिवसेनेच्या कोट्यातील दोन जागांसाठी सुभाष देसाई (Subhash Desai) सचिन अहिर (Sachin Ahir) आणि नंदुरबारचे (Nandurbar शिवसेना जिल्हाप्रमुख आमशा पाडवी (Amsha Padvi) यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, यापैकी शिवसेनेकडून कुठल्याही नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर सचिन अहिर यांनी आपला वरळी विधानसभा मतदारसंघ (Worli Assembly constituency) आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यासाठी सोडला. त्यानंतर आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी सुद्धा झाले. आदित्य ठाकरे यांच्यासाठी मतदारसंघ सोडणाऱ्या सचिन अहिर यांचे पूर्नवसन करण्यासाठी आता शिवसेनेने त्यांना विधानपरिषदेत पाठवण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

तसेच शिवसेनेकडून विधान परिषदेच्या (Legislative Council) दुसऱ्या जागेसाठी, सुभाष देसाई, सचिन अहिर यांच्यासोबत धडगाव अक्कलकुवा मतदारसंघातील (Akkalkuwa constituency) शिवसेना नेते आमशा पाडवी (Amsha Padvi) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे. २०१९ मध्ये पाडवी यांना याच मतदारसंघात काँग्रेस नेते व राज्याचे आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी (KC PADVI) यांच्याकडून अवघ्या २ हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com