दसरा मेळाव्याबाबत उद्धव ठाकरेंचे मोठे विधान; म्हणाले...

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचा यंदाचा (Dussehra Rally) दसरा मेळावा नेमका कुठे होणार यावरुन मतभेद सुरु आहेत. मात्र, काहीही झाले तरी मेळावा हा (Shiv tirtha) शिवतीर्थावरच होणार यावर ठाकरे ठाम आहेत. यासंदर्भात आज मातोश्रीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपली भूमिका मांडली आहे....

यावेळी ठाकरे म्हणाले की, शिवसेनेचा (Shivsena) दसरा मेळावा शिवतीर्थावरच घ्यायचा आहे. तेव्हा मला जे बोलायचे ते बोलेन. पण आता एक बरंय, की आत्तापर्यंत मला बोलताना तोंडावर मुख्यमंत्रीपदाचा मास्क असायचा. त्यामुळे जरा जपूनच बोलावे लागायचे. आता त्यावेळी जे सुचेल, जे बोलायचंय ते मी बोलेन, असे ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, मला कसलीच चिंता नाही. जे काही आहे, ते माझे नाही. माझी काही खासगी मालमत्ता नाही. मुख्यमंत्रीपद हवे असते तर मी क्षणभरात सोडले असते. माझ्याकडे तेव्हाही ३०-४० आमदार (MLA) होते, तेव्हा त्यांना डांबून ठेवता आले असते.

तसेच माझीही ममता बॅनर्जींसोबत (Mamata Banerjee) ओळख होती, त्यांना तिकडे घेऊन गेलो असतो. किमान कालीमातेच्या मंदिरात नेले असते, राजस्थानात (Rajasthan) त्यांना नेता आले असते, पण तो माझा स्वभाव नाही. त्यामुळे सगळ्यांना सांगितले दरवाजा उघडा आहे, राहायचे असेल तर निष्ठेने राहा, नसेल तर तिकडे जा. आता माझ्यासोबत कडवड शिवसैनिक आहेत, असेही ठाकरे म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com