दसरा मेळाव्यावरून उद्धव ठाकरे कडाडले; म्हणाले…

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या (Shivsena) दसरा मेळाव्याबाबत (Dussehra Relly) अनेक प्रश्न उपस्थित होत आहे…

आज मुंबईत (Mumbai) उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) उपस्थितीत विश्व हिंदू परिषद (Vishwa Hindu Parishad) आणि बजरंग दलाच्या (Bajrang Dal) कार्यकर्त्यांसह हिंगोलीतील (Hingoli) भाजपच्या पदाधिकार्यांनी मातोश्रीवर शिवसेनेत पक्षप्रवेश केला. त्यावेळी ठाकरेंनी दसरा मेळाव्यासंदर्भात स्पष्टीकरण दिले.

यावेळी ठाकरे म्हणाले की, शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा होणार की नाही याबद्दल संभ्रम निर्माण केला जात आहे. संभ्रम वगैरे काहीही नाही. दसरा मेळावा हा शिवसेनेचाच होणार आहे.

त्यासाठी महाराष्ट्रातून (Maharashtra) शिवसैनिक हे मुंबईकडे येण्यास निघाले आहे. परवानगीबाबत जी काही तांत्रिक मांत्रिक जो काही भाग आहे, ते पाहतील. पण शिवतीर्थावर दसरा मेळावा होणारच, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, सत्ताधारी पक्षाकडे प्रवेश करण्यासाठी रांग लागत असते. पण पहिल्यांदाच महाराष्ट्राची माती ही गद्दारांना जन्म घालत नाही, हे आज दाखवून दिले आहे. भाजपने जी हिंदुत्व सोडून दिल्याची आवई उठवली होती, त्याला छेद देणारी आजची घटना आहे.

.

दलित, बहुजन आणि मुस्लिम बांधव सुद्धा शिवसेनेत दाखल होत आहे. हे चित्र नक्की देशासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. ज्यांना ज्यांना हिंदुत्वाच्या मुद्यामध्ये फरफट झाली, खरं हिंदुत्व हे शिवसेनेकडे आहे, असे ज्यांना वाटत आहे. त्यांनी यावे, त्यांच्यासाठी मातोश्रीचे दार कायम उघडे असल्याचेही ठाकरेंनी म्हटले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *