उद्धव ठाकरे आक्रमक; शिवसैनिकांना धाडले आदेश

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरेFile Photo

मुंबई । Mumbai

शिवसेनेच्या (shivsena) तब्बल ४० आमदारांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची साथ देत भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापन केल्याने शिवसेनेला गळती लागली आहे. आमदारांपासून (MLA) सुरु झालेली ही गळती अजूनही कायम असून ती आता थेट खासदार (MP) नगरसेवकांपर्यंत (corporators) येऊन पोहचल्याने शिवसेनेला खिंडार पडले आहे...

तसेच ही सर्व परिस्थिती आता हाताबाहेर गेल्याने शिवसेनेच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असून हा मुद्दा शिवसेनेच्या चिन्हापर्यंत येऊन पोहचला आहे. मात्र अशा परिस्थितीतही शिवसेना पक्षप्रमुख (ShivSena chief) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी डगमगून न जाता पुन्हा एकदा पक्षवाढीसाठी तयारीला लागण्याचे आदेश शिवसैनिकांना (ShivSainik) दिले आहेत.

आज मातोश्रीवर (Matoshri) उद्धव ठाकरे यांची जिल्हाप्रमुख (District Chief) आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी लढाईसाठी तयार राहण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले असून कोण गेले याचा विचार न करता लोकांची कामे करा असा सल्ला दिला आहे. तसेच शिवसेना मजबूत असल्याचे लोकांना दाखवून द्या असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान यावेळी ठाकरे म्हणाले की, मुंबईत (Mumbai) ज्याप्रमाणे पक्षाचे काम सुरु आहे, त्याप्रमाणे इतर जिल्ह्यात (District) देखील कामे सुरु करा, तसेच आघाडी करण्यासंदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घ्या, असेही उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com