सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया;म्हणाले...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई । Mumbai

शिवसेनेमध्ये (Shivsena) बंडखोरी करून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी वेगळा गट (Group) स्थापन करत आपली शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला होता. त्यामुळे शिवसेना कुणाची? असा प्रश्न निर्माण झाला होता. या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी झाली. सुनावणीवेळी न्यायालयाने आज दोन्ही बाजूंचा युक्तिवाद (Argument) पूर्णपणे ऐकून घेत उद्या पुन्हा सुनावणी होणार असल्याचे सांगितले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (ShivSena chief Uddhav Thackeray) यांनी मातोश्रीवर जळगावच्या (jalgaon) शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीवर प्रतिक्रिया दिली आहे...

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, “दोन ते तीन पातळीवर आपली लढाई सुरु आहे. रस्त्यावरील लढाईत आपण काही कमी पडणार नाही. कोर्टातही सुनावणी सुरु आहे. तिसऱी लढाई म्हणजे शपथपत्र आणि सदस्य नोंदणी आहे. विषय गंभीर असून अर्ध्यात सोडू नका,” असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले. न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे असेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

तसेच आगामी काळात देशातील सर्व पक्ष संपतील, फक्त भाजप (BJP) हाच एकमेव पक्ष शिल्लक राहील. महाराष्ट्रात शिवसेनेचा अंत होत असून भाजपचा मुकाबला करण्याची क्षमता कोणत्याही राष्ट्रीय पक्षात नाही, असे विधान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (J P Nadda) यांनी केले होते. यावर देखील उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

ते म्हणाले की, शिवसेनेत याआधीही बंड (Rebellion) झाले असून मी त्यांना सामोरे गेलो आहे. परंतु आता शिवसेना संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण त्यांना माहित नाही की अशी आव्हाने पायदळी तुडवत त्याच्यावर आम्ही झेंडा रोवला आहे. तसेच राजकारणात हार जीत होत असते, पण संपवण्याची भाषा केली जात नाही, ती आता होत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com