... म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना फोन

... म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना फोन

मुंबई । Mumbai

राज्यात एकीकडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट विरुद्ध शिवसेना (Shivsena) असा सत्तासंघर्ष सुरू असताना दुसरीकडे महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे...

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, २१ जून रोजी एकनाथ शिंदे सुरतला मुक्कामी होते, त्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना फोन केला परंतु फडणवीस यांनी फोन उचलला नाही, असा दावा करण्यात येत आहे. याशिवाय उद्धव ठाकरेंनी भाजपच्या (BJP) श्रेष्ठींसोबतही संवाद साधल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता का? यासंदर्भात शिवसेनेकडून स्पष्टीकरण देण्यात आले असून सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याच्या बातम्या या निव्वळ भूलथापा असल्याचे म्हटले आहे. तसेच उद्धव ठाकरे जे बोलायचे ते खुलेआम बोलतात. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये आणि पसरवू नये, असे आवाहनही शिवसेनेकडून कऱण्यात आले आहे. तर यावर भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेले नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com