हिंमत असेल तर मध्यावधी होऊनच जाऊ द्या; उद्धव ठाकरेंचे आव्हान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई । Mumbai

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला आहे. यानंतर शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार राज्यात अस्तित्वात आले आहे. त्यातच काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, असा दावा केला होता. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख (shivsena chief) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 'हिंमत असेल, तर मध्यावधी निवडणुका होऊनच जाऊ द्या' असे आव्हान भाजपाला (bjp) दिले आहे...

यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, लढायचे असेल तर सोबत राहा. भाजपाचा शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे. असे खेळ खेळण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊ. आम्ही चुकत असू तर जनता आम्हाला घरी बसवेल.तुम्ही चुकत असाल तर जनता तुम्हाला घरी बसवेल हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक होऊनच जाऊ द्या असे आव्हान त्यांनी भाजपाला दिले आहे.

दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरेंनी घटनातज्ज्ञांना विनंती करत म्हटले की, “आपण घटनातज्ञ आहात. सध्या जे सुरु आहे ते घटनेला धरून सुरु आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकरांची घटना मोडण्याचा प्रकार सुरु आहे त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट मांडा. तसेच देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्रात जे सुरु आहे त्याबाबत सर्वाना सत्य बोलू द्या. विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे हा घटनेचा अपमान आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com