एकनाथ शिंदे यांच्या गटाचं नाव ठरलं!

एकनाथ शिंदे यांच्या गटाचं नाव ठरलं!

मुंबई | Mumbai

राज्यात राजकीय सत्तानाट्याला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी सत्तासंघर्षात एक पाऊल पुढं टाकलं आहे.

बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटाचं नाव ठरलं आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट असे नाव ठेवले आहे. आज संध्याकाळी या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील घडामोडी आता वाढणार आहेत.

दरम्यान कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलताना म्हटलं होतं की त्यांनी ठाकरे आणि शिवसेना हे नाव न घेता जगून दाखवावं. अशात आता आज शिंदे गटाचं नवं नाव समोर आलं असून यात ठाकरे आणि शिवसेना दोन्ही नावं घेतली गेली आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com